Breaking News
३० ऑगस्ट २०२२
ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिले लेखी आदेश; नॅशनल दलित मुव्हमेंट फाँर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या मागणीला यश..
अजनाळे: प्रतिनिधी
ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम कामगारांच्या नोंदणी करण्याबाबत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष समाधान धांडोरे, उपाध्यक्ष शशिकांत गडहिरे ,सचिव महेश वाघमारे, कार्याध्यक्ष प्रशांत चंदनशिवे, तालुका प्रसिद्ध प्रमुख सचिन धांडोरे ,तालुका समन्वयक लकी कांबळे ,तालुका संघटक किरण सावंत ,जीवा सावंत यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती सांगोला यांना१२ ऑगस्ट रोजी लेखी अर्जाद्वारे ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम कामगारांची नोंदणी करावी यासाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती याच मागणीचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांनी तात्काळ दखल घेवुन शासन परिपत्रक क्र व्हीपीएम २०१५/प्र क्र २३७/पंरा-३ दि २२ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना लेखी आदेश काढून बांधकाम कामगारांचे तात्काळ नोंदणी करून घ्यावी असे आदेश सांगोला पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिले आहेत. सांगोला तालुक्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून परंतु या बांधकाम कामगारांना ग्रामपंचायत स्तरावर आपली नोंदणी करण्यासाठी अडचण येत असल्यामुळे बांधकाम कामगारांच्या नोंदी झाल्या नाहीत परंतु नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेने ही मागणी सांगोल्याचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांच्याशी चर्चा करून हे नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करावी असे आदेश दिल्यामुळे बांधकाम कामगारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ मधील शासन निर्णयानुसार बांधकाम कामगाराची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करणे बाबत सर्व स्थानिक संस्थांना निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार नमुना प्रमाणपत्रात बांधकाम कामगाराने ९० दिवस काम केल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तरी आपले कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगाराची नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच प्रमाणपत्र देताना कामगारांच्या वास्तव्याचा अधिकृत पुरावा व अधिकृत फोटो असलेल्या ओळखपत्राचा नमुना अर्जासोबत जोडण्यात यावा असे लेखी अर्जात नमूद केले आहे. बांधकाम कामगारांच्या नोंदी ग्रामपंचायत स्तरावर होत असल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांमधून आनंद व्यक्त केला जात आहे व नॅशनल दलित मुव्हमेंट फाँर जस्टीस या सामाजिक संघटनेचे आभार मानले जात आहे..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा