Breaking News

विकास विद्यालय अजनाळे चे एन एम एस परीक्षेत सुयश..

अजनाळे:सचिन धांडोरे: 19 जून 2022 रोजी इयत्ता आठवी साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) केंद्र शासनातर्फे घेण्यात आली होती. या परीक्षेत प्रशालेचे 13 विद्यार्थी सहभागी झाले होते यामधून आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून *ओम वामन लाडे 105 गुण मिळवून EWS गटातून सोलापूर जिल्ह्यात 33 वा आला आहे. सदर विद्यार्थ्यास नववी ते बारावी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सदर विद्यार्थ्यास संस्थेचे संस्थापक प्रल्हाद सोपान येलपले (दादा), प्रशालेचे मुख्याध्यापक कोळवले एस. डी. सर, प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत