Breaking News

२४ ऑगस्ट २०२२

अजनाळे गावाला कुणाची नजर लागली आणी गावातील डाळिंब नष्ट झालं; खाजगी सावकराकडुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणुक

अजनाळे: सचिन धांडोरे: डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून जगभर नावलौकिक मिळवलेल्या अजनाळे गावाला कुणाची नजर लागली आणी एक-दोन वर्षात होत्याचं नव्हतं झालं अजनाळे गावात जवळपास १३०० हेक्टर वर डाळिंबाच्या बागा होत्या परंतु तेल्या,मर,आणी पिन होल बोरर या रोगांच्या प्रादुर्भावामुळे गावातील जवळपास ९०० हेक्टर वरच्या डाळिंबाच्या बागा जळुन गेल्या आहेत त्यामुळे येथिल शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादन करणाऱ्या अजनाळे गावावर कुणाची नजर लागली ऐकामाग एक डाळिंबाचे प्लॉटच्या प्लॉट जळुन गेले.मग काय गावातील डाळिंब गेलं आणि गावाला जणू उतरता काळाच लागली. डाळिंब पिकला सध्या मोठ्या प्रमाणात किड लागली आहे झाडे पिवळी पडुन मोठ्या प्रमाणात जळून जाऊ लागली आहेत. सुरुवातीला डाळिंब बागेतील एक दोन झाड पिवळे होऊन जळून जातात त्यानंतर संपूर्ण प्लॉटच्या प्लॉट काही दिवसातच नष्ट होत आहे. अजनाळे गावातील डाळिंबाने जगातील बाजारपेठ काबीज केली होती या डाळिंब पिकाने गावातील शेतकऱ्यांचे राहणीमान बदलले या डाळिंबाने आर्थिक जीवनमान ही उंचावले अजनाळे गावातील शेतकऱ्यांनी खडकाळ माळरानावर शेतीतून हमखास उत्पादन मिळत असल्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून गावातील अनेक शेतकऱ्यांनी टोलेजंग घरे बांधली आणि कित्येक शेतकऱ्यांनी आलिशान गाड्याही घेतल्या मात्र गेल्या एक- दोन वर्षापासून गावात डाळिंबाचे उत्पादन न झाल्यामुळे गाड्यांचे हप्तेही वेळेवर जाऊ शकत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना खाजगी सावकारांनी पैशाचा तगादा लावल्यामुळे गावातील काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर घेतलेल्या कर्जाचे व्याज माफ करावे व मुद्दल जसे उत्पन्न होईल तसे घ्यावे अशा विनंतीचे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे अजनाळे गावाची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे गावातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत.तरी उरल्या सुरल्या डाळिंब बागा संशोधन केंद्राने वाचवाव्यात अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा