Breaking News
२४ ऑगस्ट २०२२
.सांगोला पंचायत समितीचा विस्तार अधिकारी श्रावण घाडगे व ग्रामसेवक सुरेश फासे लाचलुचपतच्या जाळ्यात; सांगोला पंचायत समितीमध्ये उडाली एकच खळबळ..
अजनाळे: सगळीकडे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असताना मात्र सांगोला पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक सुरेश सुधाकर फासे तसेच सांगोला पंचायत समितीचा विस्तार अधिकारी श्रावण बाजीराव घाडगे या दोघांना लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजार रुपयांची लाच घेताना बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल मंजूर करून पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी अडीच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने तालुक्यात एकच खडबळ उडाली आहे.
सुरेश सुधाकर फासे वय वर्ष 45 व्यवसाय नोकरी पद ग्रामसेवक ग्रामपंचायत पारे व श्रावण बजरंग घाडगे वय वर्ष 56 व्यवसाय नोकरी पद विस्ताराधिकारी पंचायत समिती कार्यालय सांगोला यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे यातील तक्रारदार हे मौजे पारे ग्रामपंचायतीचे सदस्य असून पारे गावातील गोरडवस्ती येथे पाईपलाईनचे काम पंधराव्या वित्त आयोगांमधून सन 2020 -2021 अंतर्गत मंजूर झाले असून सदरचे काम हे पारे ग्रामपंचायतीला मिळाले असून त्या अनुषंगाने कामाचे सर्व जबाबदारी पार पाडण्याकरता पारे येथील सरपंच यांनी लेखी आदेशान्वये यातील तक्रार यांची नियुक्ती केली आहे त्यानुसार घर नमूद करून काम पूर्ण झाल्यानंतर सदर कामाचे बिल मंजूर होऊन मिळण्याकरता तक्रार यांनी पाठपुरावा केला असता यातील ग्रामसेवक फासे यांनी सदर बिलावर सही करून पंचायत समिती सांगोला येथील विस्तार अधिकारी घाडगे यांच्याकडे सादर करणे करता स्वतः करता एक टक्का 1500 रुपये पंचायत समिती येथून बिल मंजूर होण्याकरता विस्ताराधिकारी गाडगे करता प्रमाणे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये ची मागणी केली होती सदर मागणीस विस्तार अधिकारी घाडगे यांनी तडजोड अंती त्यांनी स्वतः करता पाचशे रुपये कमी देण्यास सांगून उर्वरित रक्कम ग्रामसेवक यांच्याकडे देण्यास सांगितले ग्रामसेवक फासे यांनी तक्रारदार यांच्याकडून 2500 रुपये लाच रक्कम स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले तर श्रावण घाडगे विस्ताराधिकारी यांना पंचायत समिती कार्यालय येथून तात्काळ ताब्यात घेण्यात आले तरी वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर, पोलीस अंमलदार पोना स्वामी,पोना घाडगे, सोन्नके,चापोना उडानशीव अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारा संबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ वर किंवा पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक सोलापूर येथे संपर्क साधावा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा