डिकसळ मध्ये श्री खंडोबा देवाची मूर्ती स्थापना व कलशारोहन सोहळा संपन्न ......सरपंच-चंद्रकांत करांडे यांनी दिलेला शब्द पाळला.
सांगोला/विकास गंगणे
सांगोला तालुक्यातील डिकसळ मध्ये श्री खंडोबा देवाची मूर्ती स्थापना व कलशारोहन सोहळा उत्साहात पार पडला.
डिकसळ मध्ये श्री खंडोबा देवाचे जुने मंदिर अगदी लहान होते, ही बाब डिकसळचे लोकप्रिय सरपंच मा.चंद्रकांत करांडे ह्यांच्या निदर्शनास श्री नवनाथ भगवान मंडले व श्री संतोष राजाराम मंडले आणि काही ग्रामस्थांनी आणून दिले, तेव्हा सरपंच यांनी त्यांना सांगितले की या मंदिराचा जीर्णोद्धार करतो ,असा शब्द दिला आणि सोमवारी श्री खंडोबा देवाचे मंदिर ,मूर्ती आणि स्थापना , कलशारोहन याबाबतीचा संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेऊन दिलेला शब्द त्यांनी पाळला.
श्री खंडोबा देवाची मूर्ती पंढरपूर येथून आणून रविवारी दि.२८/०८/२०२२ ला सायंकाळी ४:००वा. गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सोमवारी सकाळी ७:३०वा संपूर्ण पूजापाठ करण्यात आला आणि मूर्ती स्थापना व कलशारोहन सोहळा संपन्न झाला. श्री खंडोबा देवाचा कलशारोहन श्री. संतोष मंडले,मंदिराचे पुजारी नवनाथ मंडले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी अनेक भक्तजन, गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत