Breaking News

MGKE 2026 राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत पायोनियर शैक्षणिक संकुल य. मंगेवाडी स्कूलचे घवघवीत यश


 
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल, मंगेवाडी येथील विद्यार्थ्यांनी MGKE 2026 राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या परीक्षेत एकूण 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. याप्रसंगी सूत्रसंचालन सौ. बबिता राऊत मॅडम यांनी  उत्कृष्टरित्या केले.

कु. अन्विता रमेश पाटील (इयत्ता 3 री) हिने 204 गुण मिळवत केंद्रात 8 वा, विभागात 43 वा आणि राज्यात 48 वा क्रमांक प्राप्त केला.

तसेच कु. रिया विश्वास शितोळे (इयत्ता 7 वी) हिने 212 गुण मिळवत तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात 30 वा आणि राज्यात 40 वा क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष मा. अनिल येलपले सर, संस्थेच्या सचिवा सौ. मनीषा येलपले, पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मा. सतीश देवमारे सर तसेच पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य मा. सोमनाथ आदलिंगे सर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या यशामागील मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या पानाची भर पडली आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापनावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे, पालकांचे आणि परिसराचे नाव अधिक उंचावावे, असा शुभेच्छापर संदेश मान्यवरांनी यावेळी दिला.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अनिल येलपले सर यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचा समारोप प्रवीण खताळ सर यांनी आभार प्रदर्शन करून केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत