लिंगेयक्य कोळेकर महास्वामीजी तिसावे पीठाधिपती यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त कोळेमठात विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सांगोला प्रतिनिधी
श्री गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पीठाधिपती यांच्या आशीर्वादाने व श्री श्री श्री श्री 108 रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी 31वे पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगे क्य गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गुरु गादी मठ कोळे ता. सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे वीरशैव लिंगायत समाज व समस्त ग्रामस्थ कोळे यांनी सांगितले.
रविवार दिनांक 21 जून रोजी पहाटे पाच पासून श्री च्या समाधीस लघुरुद्राभिषेक, सकाळी दहा वाजले पासून शिवभक्त सचिन महाराज कुंभार दिघंची यांचे कीर्तन, भजन, महा मंगल आरती, फुले, व श्री श्री श्री 108 गुरुमुर्ती निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी 31 वेळ पिठाधिपती यांचे आशीर्वचन व त्यानंतर महाप्रसाद होईल तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन गुरु गादी मठ संस्थान कोळे तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत