गुरु हा जीवन मार्गातील दीपस्तंभ आहे.... -कोळेकर महास्वामीजी...! लिंगैक्य कोळेकर महास्वामींचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा कोळे मठात संपन्न
नाझरे प्रतिनिधी
गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मैय श्री गुरवेन महा याप्रमाणे गुरु हा परब्रम्ह असून, गुरु ज्ञान वैभवपर्यंत नेतात व गुरु धर्माचे पालन करणारा, आदेश देणारा व मार्गदर्शन ही करणारा असून, गुरु हा आई-वडील बहिणीसारखा माया करणारा तर आहेच व जीवनात एकच गुरु करा व त्यांच्यावर निष्ठा प्रेम ठेवा व अडचणीतून तोच तुम्हाला बाहेर काढणार आहे म्हणजे गुरु हा जीवन मार्गातील दीपस्तंभ आहे असे कोळेकर महास्वामीजी 31वे पिठाधिपती यांनी लिंगे कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कोळे ता. सांगोला मठात आशीर्वाचनात सांगितले. यावेळी शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजी प्रमुख उपस्थित होते.
कोळे मठात द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचे गुरुमूर्ती निर्वाण रुद्र पशुपती महास्वामीजी 31 वेळ पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव लिंगायत समाज, कोळे गुरु गादी मठ संस्थान व ग्रामस्थ यांनी शिस्तबद्ध आयोजन केले होते. सुरुवातीस गुरुवर निष्ठा ठेवा, नामस्मरण करा व आपल्या अनंत अडचणीतून गुरु मार्ग काढत असतो यासाठी गुरु महत्त्वाचे आहेत असे शिवभक्त हनुमंत कोरे महाराज व मुक्तापुरे महाराज यांनी सांगितले. तर तिसावे पीठाधिपती कोळेकर महाराज यांनी कधीही भेदभाव व जातीभेद केला नाही व सर्वांवर प्रेम केले व त्यांच्यामुळे आज मी कीर्तनात उभा आहे हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे तसेच गुरुच्या माध्यमातून देवाचे दर्शन होते असे कीर्तनात सचिन कुंभार महाराज यांनी सांगितले. महास्वामीच्या दर्शनासाठी कोळेमटात भक्तगणांचा महापूर दिसत होता. दुपारी बारा वाजता श्री ची पुष्पोष्टी संपन्न झाली.
नाझरे प्रतिनिधी
सदर प्रसंगी कोळेकर महास्वामींचे व वेळापूरकर महास्वामींचे स्वागत शिवभक्त तानाजी गोडसे व प्रभू कोरे यांनी केले तर महाआरती शिवभक्त रामहरी गोडसे व सौ. अर्चना गोडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आली व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी उद्योगपती बाळासाहेब एरंडे, उल्हास दादा धायगुडे, प्रशांत वलेकर, मा.जि.प. सदस्य सचिन देशमुख यांच्यासह महिला, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी हर हर महादेव, माऊली, माऊली गुरुराज माऊली, माझी कोळेकर माऊली नावाने मोठ्याने जयघोष करण्यात आला.
रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी सर्व समाजास प्रकाश देणारे होते..
गुरु हा जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देण्याचे काम करतात व गुरु हा संत कुळीचा राजा असून, उदबत्ती सारखे समाजास ज्ञानरूपी सुगंध देतात. कोळेमटाचा व वेळापूर मठाचा फार जवळीक व जुना संबंध आहे, या अगोदरचे कोळेकर महास्वामीजी व आमचे वेळापूर कर महास्वामीजी दोघांनी एकत्र शिक्षण घेतले व आताचे कोळेकर महास्वामीजी व आम्ही दोघे एकत्र आहोत व हे नाते यापुढेही राहील. मानवी जीवनामध्ये गुरु हा अत्यंत महत्त्वाचा असून, तिसावे पिठाधिपती हे पण ती सारखे होते व सर्व समाजास प्रकाश देणारे होते व त्यांचे दर्शन आत्ताचे 31वेपीठाधिपती रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांच्यामध्ये होत आहे व त्यांनी दिलेल्या मार्गाने सर्वांनी जा म्हणजे जीवनात काहीही कमी पडणार नाही
शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजी..





कोणत्याही टिप्पण्या नाहीत