Breaking News

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे नायगाव दादर मुंबई येथे प्रबोधन


 सांगोला प्रतिनिधी 

       श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरले आहे आणि ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे, जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते. यासाठी रविवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी चार वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हॉल नायगाव दादर पूर्व मुंबई येथे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरुवर्य सरस्वती स्वामीभक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. 


 
   सदर प्रबोधनास उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाश होणाळकर, शंकर काळे व आनंदा कदम यांनी केले आहे. गुरु भक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून घेण्यासाठी या प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रमोद पाटील व अर्जुन अहिरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत