Breaking News

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे ढवळेश्वर येथे प्रबोधन



 सांगोला प्रतिनिधी 
     श्री गुरु नरसी सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरली आहे आणि ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचाच सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे, जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते. यासाठी रविवार दिनांक 14 जून रोजी दुपारी चार वाजता न्यू इंग्लिश स्कूल ढवळेश्वर ता. खानापूर.जि. सांगली येथे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. 
 

  सदर प्रबोधनास उपस्थित राहावे असे आवाहन स्वामीभक्त राजेंद्र साळुंखे, सतीश पवार, शिवाजी मोहिते, सौरभ भोसले, सोमनाथ पाटील , राहुल घाडगे यांनी केले आहे. गुरु भक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून घेण्यासाठी या प्रबोधनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन शरद नलवडे, सनी साठे, भगवान भोसले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत