ईस्ट लिंग पूजन, आशीर्वाचन सोहळा व मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचा लक्ष्मी दहिवडी येथे प्रकाशन सोहळा
सांगोला प्रतिनिधी
ज्येष्ठ अधिक मासानिमित्त विश्वशांती व लोककल्याणार्थ ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी नऊ वाजता कमळ स्वामी दहिवडकर मठ जुंधळे वस्ती लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा येथे धर्म दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वेद.. वेदांताचार्य श्री श्री श्री 108 श्री गुरु गुरु सिद्ध मनीकंठ शिवाचार्य दहिवडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरु महास्वामीजींचा दर्शन सोहळा, ईस्ट लिंग पूजन, आशीर्वचन व मार्ग हा मुक्तीचा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भव्य व दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे तरी सर्व सदभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी दहिवडी ग्रामस्थ व श्री कमळ स्वामी दहिवडकर मठ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत