नाझरे येथे श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशिर्वचन, धर्मसभा व दर्शन सोहळ्याचे आयोजन.
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथे श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शनिवार दिनांक 13 जून रोजी सायंकाळी पाच वाजता नाझरे येथे अधिक मास निमित्त वीरभद्र मंदिर येथे आशीर्वचन, धर्मसभा, मिरवणूक व दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन केले आहे.
श्री श्री श्री 108 वेदांताचार्य गुरु सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महाराज, श्री श्री श्री 108 डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व श्री श्री श्री 108 श्री गुरु निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरु महास्वामीजींचा दर्शन सोहळा, ग्रंथ दिंडी सोहळा, मिरवणूक, आशीर्वचन, व महाप्रसाद होईल तरी गुरु महाराजांच्या दर्शन सोहळ्यास नाझरे व परिसरातील शिवभक्तांनी हजर राहून शोभा वाढवावी व या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त नाझरे, वझरे, कारंडेवाडी वीरशैव समाज मंडळाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत