Breaking News

सांगोल्यात यलमार आजी माजी सैनिक सस्नेह मेळावा संपन्न


 सांगोला प्रतिनिधी:

दिनांक ०६ जून २०२६ रोजी यलमार आजी-माजी सैनिक स्नेहमेळावा हॉटेल श्रीराम (बायपास),सांगोला येथे मोठया दिमाखात पार पडला. मेळाव्यासाठी आजी-माजी सैनिकांनी आपल्या कुटुंबासोबत मेळाव्यासाठी पुणे,सोलापूर, सातारा, सांगली, या जिल्ह्यातून अनेक सैनिकांनी हजेरी लावली.

सैनिक ही देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे . ते राष्ट्राचे रक्षक आहेत. सैनिक हा अत्यंत निस्वार्थीपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाची रक्षा करतो. सैनिकाची कामगिरी खूप कठीण आहे.त्यांचे जीवन अत्यंत खडतर आहे. असे असले तरी, संकटांना न जुमानता ते नेहमीच त्यांचे कर्तव्य पार पाडतात.

 कार्यक्रमाची सुरवात सकाळी ११ वाजता दिपप्रज्वलनाने झाली. सुरवातीला वंदे मातरम च्या गीताने तिरंग्याला मानवंदना दिली त्या नंतर शहीद जवनांना दोन मिनिटाचे मौन ठेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.

नवीन भरती झालेल्या सैनिकांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार त्यानंतर विरपत्नी यांचा सत्कार तसेच २०२५-२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर सेवानिवृत्त होऊन महाराष्ट्र मध्ये पुन्हा नोकरी साठी नियुक्त झालेले अशा ही सर्वांचा सत्कार करण्यात आला सत्कारा नंतर सर्वांनी स्वतःचा परिचय देऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यानंतर मुलांनी आपल्या कला सादर करून सर्वांना मोहित केले. त्यानंतर त्या मुलांचा सत्कार करण्यात आला जिल्हा सैनिक अधिकारी श्री संजय यलमार यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मध्ये येणाऱ्या अडचणी तसेच सैनिक पाल्य शिष्यवृत्तीबद्दल सखोल माहिती दिली .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक चौगुले व श्री रमेश विटेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत