Breaking News

नाझरे येथे शिक्षक प्रशांत रायचुरे व इंजिनियर शिवम रायचूरे यांचा सत्कार संपन्न..


नाझरे प्रतिनिधी 

        नाझरे येथील रहिवाशी व विद्यामंदिर येथे कार्यरत असलेले शिक्षक प्रशांत रायचुरे यांची सांगोला लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदर्श मा. मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके यांच्या शुभहस्ते व जर्मनी येथे कार्यरत असलेली इंजिनियर शिवम रायचूरे यांचा सत्कार पत्रकार रविराज शेटे यांच्या शुभहस्ते अरुण रायचुरे नाझरे यांच्या निवासस्थानी करण्यात आला. अध्यक्षस्थानी क्रीडाशिक्षक धोंडीराम पाटील हे होते. 

     सुरुवातीस प्रगतशील शेतकरी बाळासो चौगुले यांनी सत्कारमूर्ती शिवम रायचुरे व रायचूरे परिवाराविषयी माहिती सांगितली. तसेच जिद्द, चिकाटी, परिश्रम व नम्रता या गुणावर शुभम यांनी जर्मनी मध्ये एम एस ही पदवी प्राप्त केली व त्याच्या या यशामागे त्याचे स्वतःचे तसेच वडील अरुण व आई स्वाती रायचुरे यांचे परिश्रम वाखण्याजोगे आहे. व सांगोला लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत रायचुरे यांची निवड गुरुवर्य प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा विश्वास संपादन केल्यामुळे झाली असल्याचे आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके यांनी सांगितले. तसेच सत्कारमूर्ती प्रशांत व शिवम यांनीही यामागे आई-वडील व गुरुजनांची प्रेरणा मिळाली व याचबरोबर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद लाभले असे सत्कार प्रसंगी सांगितले. 

    सदर प्रसंगी पोलीस कर्मचारी बाबू भाई मिया काजी, उद्योगपती मदन रायचुरे, सेवानिवृत्त शिक्षक दीपक शिरदाळे, अण्णा रायचुरे, रघुनाथ रायचुरे, अनिल रायचुरे, शंभू ढोले, नितीन रायचुरे, संतोष रायचुरे, विजय रायचुरे, यश रायचुरे, इंजि. अरुण रायचुरे, सौ. स्वाती रायचुरे, सौ. मनीषा रायचूरे , विकास रायचुरे, सत्यम रायचूरे, शिवकुमार रायचूरे इ. उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार मा. उपसरपंच नागेश रायचुरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत