अधिक मासानिमित्त नाझरे येथे दिंडीचे आयोजन.
नाझरे प्रतिनिधी
अधिक मासानिमित्त नाझरे ता. सांगोला येथे श्री विठ्ठल रुक्मिणी या मंदिरापासून दिंडीची सुरुवात उत्साहाने झाली असून, यामध्ये युवावर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने सामील झाले आहे.
अधिक मासा निमित्त अधिकाधिक काळ हा भगवंताचे ध्यान, स्मरण, पूजन, नामस्मरण व भजन करून भगवंताच्या अधिकाधिक जवळ जाणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे दिसत आहे.
अर्थातच हे जवळ परमेश्वराच्या जाणे, राहणे, सानिध्यात राहणे हे केवळ शारीरिक नको तर ते मानसिक म्हणजे मनोभावे, एकाग्र, शांत व प्रसन्न मनाने आणि अनन्य शरणागत भावाने असावे म्हणजे अधिक महिन्यातील या दिंडी पर्वणीचे लाभ सर्वांना मिळेल व हे कल्याणकारी ज्ञान दिंडीच्या रूपाने तुमच्या आमच्यासाठी सर्वांना मिळेल एवढे मात्र खरे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत