गुरु हा साक्षात परब्रह्म आहे.. कोळेकर महास्वामीजी
नाझरे प्रतिनिधी : गुरु हा ज्ञान संपादन व चारित्र्यवान पाहिजे तसेच तो धर्माचे पालन व उपदेश व आदेश करणारा असावा व अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम गुरूच करतात, तो आई-वडील, बहिणी सारखा प्रेम करणार असतो व अडीअडचणी व मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्याचे काम करतो म्हणून गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे य श्री गुरुवे नमः असे म्हटले जाते म्हणजे गुरु हा साक्षात परब्रम्ह आहे असे कोळेकर महास्वामीजी 31 वे पिठाधिपती यांनी महादेव मंदिर सरगर वाडी नाझरे ता. सांगोला येथे 23 व्या वर्धापन दिनानिमित्त आशीर्वाचनातून सांगितले.
एका गुरूकडून दीक्षा घेतली तर ती परत दुसऱ्या कोणाकडून घेऊ नये व गुरु हा एकच असतो म्हणून गुरुची सेवा करा व गुरुचे आज्ञा पाळा व गुरूच्या मार्गावरून वाटचाल करा अशी ही महास्वामिनी सांगितले. सुरुवातीस गुरुचे महत्व व महात्म्य याबाबत रविराज स्वामी व शंकर स्वामी यांनी माहिती दिली. तसेच महास्वामींची पाद्यपूजा मा. सरपंच सौ. व श्री संजय सरगर यांच्या शुभहस्ते तर महाआरती मा. सरपंच हनुमंत सरगर यांच्या शुभहस्ते तर गुरूंचा सत्कार मा. उपसभापती सुनील चौगुले, मा. उपसरपंच मधुकर आलदर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी असंख्य शिवभक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत