स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.. निवास नरबट क. अभियंता
नाझरे प्रतिनिधी
वीज बिलातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉफ सोलार योजना जाहीर केली असून, या योजनेअंतर्गत केंद्राबरोबर राज्य शासनाकडून अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे तरी या सोलर योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण कार्यालय नाझरे ता. सांगोला येथील क. अभियंता निवास नरबट यांनी केले आहे.
नाझरे महावितरण कार्यालय अंतर्गत नाजरे, वझरे, बलवडी, अनकढाळ, चिनके, वाटंबरे, चोपडी, उदनवाडी, कारंडेवाडी, झापाचीवाडी, पाचेगाव या गावातील सुमारे 3300 ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार असून, यामध्ये पुढे वाढ होणार आहे तसेच प्रथम प्राधान्य तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ वीज ग्राहकांनी घ्यावा असे आवाहनही नरबट यांनी केले आहे. स्मार्ट योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना पस्तीस टक्के, तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांना 30 टक्के तर सर्वसाधारण गटाला 20% अतिरिक्त अनुदान राज्य शासनाकडून दिले जाणार आहे.
चौकट
एक किलो वॅट सौर प्रकल्पासाठी अंदाजे 50 हजार रुपये खर्च गृहीत धरून केंद्र शासनाकडून तीस हजार रुपये अनुदान मिळत आहे. याशिवाय दारिद्र्यरेषेखाली ग्राहकांना राज्य शासनाकडून सतरा हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार असून त्यांना केवळ 2500 रुपये खर्च करावे लागतील. इतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहकासाठी ग्राहक हिस्सा पाच ते दहा हजार रुपये दरम्यान राहणार आहे. योजनेची अंमलबजावणी महावितरण मार्फत केली जाणार असून यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक केली आहे तरी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
मा. हनुमंत बनसोडे,
उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय हातीद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत