लोकाभिमुख कारभारासाठी शासनाचे महाराजस्व अभियान गरजेचे- तहसीलदार बाळू ताई भागवत..! नाझरे येथे 597 लाभार्थ्यांना विविध योजनांचा मिळाला लाभ
नाझरे प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाकडे पाहिले जात आहे व ते लोकाभिमुख होण्यासाठी सांगोला तालुक्यात हे अभियान राबविले असून जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, उपविभागीय अधिकारी बी आर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकाभिमुख होत असल्याचे पाहून आनंद होत आहे व आज नाझरे विद्यामंदिर ता. सांगोला येथे या समाधान शिबिरात प्रतिसाद चांगला आहे असे मत तहसीलदार बाळू ताई भागवत यांनी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.
सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार बाळू ताई भागवत, उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य बापू जावीर, सरपंच रंगनाथ बंडगर, डॉ. विजय सरगर, मा. सरपंच संजय सरगर, सोसा. व्हॉ. चेअरमन गोरख आदाटे, मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव, पर्यवेक्षक, विनायक पाटील, पत्रकार रविराज शेटे, अतुल फसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य बापू जावीर, कृषी सहाय्यक बाळासाहेब सावंत, अतुल फसले यांनी शासनाचा उपक्रम चांगला असल्याचे सांगितले व शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता तसेच महसूल विभागासह, विविध शासकीय विभागामार्फत 597 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. व नागरिकांच्या वेळेची व खर्चाची बचत झाली, तसेच तहसीलदार बाळूताई भागवत यांनी शिबिरात बराच वेळ देऊन नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून मार्गदर्शन केल्याने शिबिर खरोखरच समाधानी झाल्याचे नागरिकात बोलले जात आहे.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी तलाठी राजेंद्र जाधव, मधुकर वाघमोडे तसेच महसूल चे सर्व अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, भुमिअभिलेख चे कडकंचीसो, तसेच इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक सुनील जवंजाळ तर आभार पत्रकार रविराज शेटे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत