रक्तदान हेच श्रेष्ठ दान.. -गुरुवर्य भालचंद्र पाटील काका
सांगोला प्रतिनिधी
श्री क्षेत्र दत्त देवस्थान ट्रस्ट मोराळे पेड ता. तासगाव येथे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज व शिवदत्त महाराज यांच्या कृपाशीर्वादाने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते व आध्यात्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्य करून दत्त देवस्थाने वेगळा ठसा उमटविला व रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे असे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.
सदर रक्तदान शिबिरात रक्तदात्यास सर्टिफिकेट, हेल्मेट चे वाटप गुरुवर्य भालचंद्र पाटील काका, गुरुवर्य संतोष दादा पाटील, गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त सूर्यकांत दादा पाटील, राहुल शिंदे, बबलू भैया रविराज शेटे, विलास माळी हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी 151 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी एम एस आय ब्लड बँक सांगली येथील डॉक्टर प्रथमेश पाटील, डॉक्टर माधवी पाटील, मुस्कान शेख, स्वरांजली चव्हाण, प्रवीण कुंभार, शितल हन्नुरे, सागर पाटोळे, आयर्न सिद्ध, रक्तदाते, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे स्वागत सूर्यकांत दादा पाटील यांनी तर आभार राहुल शिंदे यांनी मानले.दत्त देवस्थान मोराळे तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत व त्यापैकी रक्तदान हा असून, त्या कामी रक्तदात्याचे व सेवेकरांचे फार मोठे योगदान आहे.
गुरुवर्य संतोष उर्फ बंडू दादा पाटील.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत