Breaking News

मतदार याद्या चिन्हांकित तपासणी पूर्ण,पोलीस पाटील, बैठक निवडणूक तयारीला वेग


 सांगोला प्रतिनिधी:-    जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आत्ता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी  माननीय राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने मतदानाची तारीख दोन दिवसांनी पुढे घेण्यात आली असून आत्ता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान घेण्यात येणार आहे त्यासाठी मतदानाच्या याद्या तपासणी, चिन्हांकित करणे, मतदान केंद्रावर वर्किंग कॉपी देणे, पोस्टल मतदानाची नोंद घेणे, (पीबी) टॉप सीट बनवणे या कामाला वेग आला असून या कामी *पथक प्रमुख सुनील बेलभंडारे निवडणूक नायक तहसीलदार* यांचे मार्फत काम पूर्ण केले आहे या कामी सांगोला मंडल अधिकारी सर्व सांगोला, शिवणे, संगेवाडी, नाझरा, महूद,कोळा, हातीद, जवळा व घेरडी एकूण नऊ मंडल अधिकारी व त्यांचे अधीनस्थ ग्राम महसूल अधिकारी उपस्थित असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे सांगोला.    

     तालुक्यात एकूण मतदार  2,62,367  असून त्यापैकी पुरुष मतदार 1,35,923 , स्त्री मतदार 1, 26, 440 व इतर चार मतदार आहेत त्यासाठी 274 बूथ स्थापन केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितले आहे त्याचबरोबर  प्रत्येक बुथवर शांतता राखणेसाठी  आज पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली त्यामध्ये प्रत्येक बूथवर कायदा सुव्यवस्था राखणे, पोलीस प्रशासनास सहकार्य करणे, गुन्हेगारी ची माहिती देणे, मतदान प्रक्रियेस सहकार्य करणे, गावातील वादविवादाची माहिती देणे याबाबत पोलीस पाटील यांना सूचना निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिले आहेत या बैठकीला सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत