सणाला कोणतंर नवीन कापड घेईल म्हणून त्याच्या घरी दिवाळी साजरी न करता आपल्या घरी करा............ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख...! विजय दादाच्या गळ्यात उमेदवारी पडायची हे नाथाच्या मनात होतं.....मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील
नाझरे प्रतिनिधी
सणाला कोणतरी कापड नवीन घेईल म्हणून त्याच्या घरी दिवाळी साजरी न करता, आई-वडिलांची संस्कृती जपा व आपल्या घरी दिवाळी साजरी करा व गावात वेगळा पांडा न पडता व भूलथापांना बळी न पडता जिल्हा परिषद चोपडी गटाचे उमेदवार विजय दादा शिंदे व गणाचे अनिल जगदाळे यांनाच विजयी करा असे बलवडी ता. सांगोला प्रचार सभेत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
निवडणूक आली की रस्ते, डीपी, डांब रोवणे सुचतंय परंतु त्यास कनेक्शन मिळणार नाहीत मग बोडक्या डांबाला मते देता का व यासाठी मतदारांनी या भूलभुलय्याच्या गोष्टीच बळी पडू नका, जे आपल्या सुखात व दुःखात साथ देतात त्यांनाच मतदान करा तसेच येथील डॉ. भोपाल धायगुडे, धनाजी शिंदे यांनी अर्ज भरला व माघारी घेतला म्हणजे एक पाऊल मागे तर पक्ष आता चार पावले पुढे त्यांना नेणार व येथील दुसरे उमेदवार उल्हास धायगुडे हे सुद्धा पक्षात असते तर त्यांच्या पदरात माफ पडलं असतं व यासाठी पुढेही या स्वागत करू. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत असलेले डॉ. शिवाजीराव ढोबळे यांचे बलवडी गाव आहे व त्यामुळे आबासाहेबांचा वारसा वसा टिकविण्यासाठी विजय शिंदे व अनिल जगदाळे यांनाच विजयी करा असे आवाहनही आमदार देशमुख यांनी यावेळी केले. तर आबा सांगोलकर व सांगोलकर वस्ती ची काळजी करू नका असे तानाजी शेठ सांगोलकर यांच्याकडे पाहून आमदार देशमुख यांनी सांगितले यावेळी हास्याचे पिसारे सर्वांचे फुलले.
कोणीही बाहेरून धनवानाने यावे व चोपडी गट विकत घ्यावा हे बरोबर नाही तर स्थानिक उमेदवारास प्राधान्य द्या ते आपल्या सुखदुःखात साथ देतील व आज विजय दादा मुळे बलवडी गाव एकत्र झाले याचा मला आनंद आहे व यासाठी बाळू पंचाचा सल्ला महत्वाचा आहे व विकास मोहिते यांनीही पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतो, तसेच दुसरे उमेदवार आमचे मित्र उल्हास धायगुडे यांनीही विचार करावा. विजय दादाच्या गळ्यात उमेदवारी पडले त्याचे गावाने सोने करावे व अनकढाळ गावात ज्याप्रमाणे मतदान होते त्याप्रमाणे बलवडी गावाने करावे व गावाचा एकोपा टिकवून नारळ व तुतारी वाजवणारा माणूस चित्र पाहून मतदान करा व तसेच विजयासाठी रामबाबर यांचेही योगदान मोठे आहे त्यांनाही आम्ही विसरणार नाही व कोणाच्याही आमिषाला, पैशाला बळी न पडता विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहनही मा. आमदार साळुंखे पाटील यांनी केले आहे. सुरुवातीस सर्वांचे स्वागत शिवाजी शिंदे यांनी केले तर चोपडी गटात उमेदवार देताना इतर पक्षांनी पैशाच्या जोरावर बाहेरचा उमेदवार दिला व पैशाच्या जोरावर निवडणूक होत नसते व बलवडी गाव हे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील या जोड गोळीच्या पाठीमागे उभे राहील याची खात्री देतो असे मा. सरपंच बाळासो शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर सर्वांना घेऊन जाणारा व सर्वा बरोबर बोलणारा असावा व ही निवडणूक धनदांगड्या विरुद्ध जनसामान्याची आहे व त्यामुळे आपल्या मातीतील उमेदवार विजय शिंदे व अनिल जगदाळे यांनाच विजयी करा असे आवाहन ही युवा नेते दादासो हरिअर यांनी यावेळी केले.
सदर प्रसंगी सरपंच माऊली राऊत, उपसरपंच शिवाजी शिंदे, समाधान शिंदे, खरेदी-विक्रीचे चेअरमन रमेश जाधव, शेकाप चिटणीस दादासो बाबर, मनोज ढोबळे, सोसा. चेअरमन शिवाजी शिंदे, ऍड सत्यजित लिगाडे, मा. सरपंच प्रसाद शिंदे, मा. पोलीस पाटील शिवाजी धायगुडे, डॉ सुरेश धायगुडे, चेअरमन संजय पाटील, डॉ. राज मिसाळ, ग्राम. सदस्य कृष्णदेव कारंडे, मनोहर राऊत, बाबासाहेब पालसांडे, जितेंद्र पालसांडे, सचिन धोकटे, गणेश कमले, रविराज शिंदे, अजिंक्य शिंदे, स्वप्निल शिंदे, रमेश शिंदे, बालेखान शेख, महादेव पवार, शिवाजी शिंदे, रविराज लिगाडे, मेघराज लिगाडे, सूर्यकांत शिंदे, डीपी कारंडे, सुरेश शिंदे, सुरेश धोत्रे, संजय धोत्रे, बाबुराव जाधव, बाजीराव शिंदे, बाळासो खुळपे, बाळासो कारंडे, सदाशिव गायकवाड, दत्तात्रय शिंदे सर, दत्तात्रय कारंडे, मुरलीधर धायगुडे, अर्जुन धायगुडे, डॉ. सुरेश धायगुडे, विजय धायगुडे, जयसिंग धायगुडे, राजू धायगुडे, इंद्रजीत धायगुडे, किशोर एडके, तात्यासाहेब शिंदे, विकास शिंदे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सरपंच माऊली राऊत यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत