सांगोला प्रतिनिधी
शिवमूर्ती लिंगायत सामाजिक संस्था विटा यांच्यावतीने वडूज येथील पंचरत्न मंगल कार्यालय पुसेगाव रोड येथे रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत मोफत भव्य राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे अच्युत दुगमे व सौ. शांता ताई दुगमे यांनी सांगितले. तसेच वीरशैव लिंगायत समाज वडूज यांनी भव्य आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर मेळाव्यास शिवा लिंगायत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद जी पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच लिंगायत समाजातील सर्व जाती, पोट जाती, विधवा, विदुर, घटस्फोटीत यांच्यासाठी हा मेळावा मोफत असून यासाठी शिवमुर्ती लिंगायत संस्था विटा व वीरशैव लिंगायत समाज वडूज सज्ज असून, या कामी अच्युत दुगमे व सौ. शांता ताई दुगमे या परिवाराचे फार मोठे योगदान आहे व वधू-वराकडून एकही पैसा न घेता मोफत वधू वर मेळाव्याचे सातत्याने नियोजन होत आहे असे विजयकुमार ठिगळे यांनी सांगितले. तरी सर्व वधू वर व पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज वडूज तर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत