Breaking News

नाझऱ्याची लेक अकलूजची नगराध्यक्षा.. नाझरे येथे सत्कार संपन्न..


 नाझरे प्रतिनिधी 

     नाझरे ता. सांगोला येथील लेक सौ. रेश्मा ताई लालासाहेब आडगळे वाघमारे यांची अकलूजच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याने, नाझरे ग्रामपंचायत समोर सौ. रेश्मा आडगळे व लालासाहेब आडगळे यांचा सत्कार माजी सरपंच शामराव आप्पा वाघमारे, लहुजी पॅंथर सेनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

     सदर प्रसंगी मा. ग्रामपंचायत सदस्य भारत वाघमारे, सागर वाघमारे, वाघमारे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी गावात सत्कार झाल्याबद्दल आम्हास आनंद होत आहे असे नूतन नगराध्यक्षा सौ. रेशमा आडगळे यांनी मत व्यक्त केले, तर नाझरे गावाच्या ऋणात आम्ही राहून काम करू असे लालासाहेब आडगळे यांनी सांगितले. शेवटी सर्वांचे आभार नितीन रणदिवे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत