Breaking News

नाझरे येथे वीरभद्र मंदिरात बाबुराव अण्णा पट्टणशेट्टी यांचा अग्निहोम संपन्न..


नाझरे प्रतिनिधी 

        नाझरे ता. सांगोला येथील वीरभद्र मंदिरात, वीरभद्राचे सेवेकरी भक्त बाबुराव अण्णा पट्टणशेट्टी जत जि. सांगली यांचा नवसाचा अग्निहोम मंदिरात संपन्न झाला. 

     अथर्व पटन शेट्टी यांच्या शुभहस्ते श्री रुद्राभिषेक करण्यात आला. तसेच दुपारी बारा वाजता अग्नी प्रचलित करण्यात आला. यावेळी श्रीची महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. 
तसेच रविराज शेटे यांचा बाबुराव आण्णा पट्टणशेट्टी, अन्नपूर्णा बाबुराव पटन शेट्टी, अथर्वपटनशेट्टी, अण्णा स्वामी व रविराज स्वामी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी राजू पाटील, राजू खोकले, बाळासो स्वामी, शंकर स्वामी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंचाक्षरी स्वामी, माणिक स्वामी, पोपट स्वामी, शिवाजी स्वामी, शरद स्वामी, चंद्रकांत स्वामी, रामचंद्र शेटे, सर्व स्वामी वर्ग, भक्त मंडळी, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत