निवडणुकीत हार व जीत होतच असते..- लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने..! होनराव परिवारातर्फे नूतन नगरसेवकांचा सत्कार संपन्न
सांगोला प्रतिनिधी
निवडणूक म्हटली की कोणाचे हार तर कोणाची जीत ही होतच असते व त्यामुळे याकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलून आपण सांगोला शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहो व होनराव व आमच्या कुटुंबांचे संबंध पूर्वीपासून चांगले आहेत व राहतील तसेच त्यांनी केलेल्या सत्कारामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो असे मत लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांनी होनराव परिवारातर्फे होत असलेल्या सत्कार प्रसंगी सांगोला येथे मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी उद्योजक नानासाहेब होनराव हे होते.
सदर प्रसंगी नूतन नगरसेविका सौ राणी माने, सौ वैशाली सावंत, सौ गोदाबाई बनसोडे, सौ आशादेवी यावलकर, सौ वैशाली झपके, सौ छाया मेटकरी, सौ सीमा सरगर, सौ अनिता केदार, नूतन नगरसेवक रामचंद्र मदने, प्रशांत धन वजीर, अरुण पाटील, ज्ञानेश्वर तेली, काशिलिंग गावडे, चैतन्य राऊत, विवेक पाटील, नितीन आबासाहेब इंगोले, गणेश बनकर इ. नगरसेवकांचा होनराव परिवारातर्फे चंदन होनराव, नरेंद्र होनराव, राजू होनराव, बाळासो होनराव, योगेश होनराव, अक्षय होनराव, प्रेम होनराव, मल्हार होनराव, सौ अनिता होनराव, सौ शिल्पा होनराव, सौ पल्लवी होनराव, सौ समृद्धी होनराव, सौ श्वेता होनराव, सौ धनश्री होनराव, सौ सुप्रिया होनराव, कुमारी स्वरा होनराव, तेजल होनराव इत्यादींच्या शुभहस्ते भव्य सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी मा. नगरसेवक शिवाजी बनकर, सोमेश यावलकर, कीर्तीपाल बनसोडे, शिक्षक नेते पोपट केदार इ. उपस्थित होते. सूत्रसंचालन उद्योजक इरशाद बागवान तर आभार सतीश वाघ यांनी मानले. राजकारणाच्या वेळी राजकारण, इतर वेळी समाजकारण व पक्ष, पार्टी न पाहता सत्कारामुळे ऊर्जा व प्रेरणा मिळावी तसेच स्नेहबंध आहेच तो अधिक वृद्धिगत व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून होनराव परिवारातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन केले.चंदन उर्फ सुहास होनराव
मा. नगराध्यक्ष सांगोला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत