Breaking News

कोळा गावातील पोलीस आऊट पोस्ट अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत; सार्वभौमिक मानवाधिकार संघटनेची शासनाकडे पुन्हा ठाम मागणी..


 

कोळा प्रतिनिधी:

कोळा गावातील पोलीस स्टेशन गेल्या ३० ते ४० वर्षांपासून अत्यंत वाईट व जीर्ण अवस्थेत आहे. या पोलीस स्टेशनची इमारत मोडकळीस आलेली असून, कर्मचारी व नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. पावसाळ्यात गळती, अपुरी जागा, स्वच्छतेचा अभाव आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा अवस्थेतूनही आजपर्यंत शासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, ही बाब चिंताजनक आहे.

या संदर्भात सार्वभौमिक मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सावंता सरगर, जिल्हा सचिव अमित मोरे, तालुका सचिव दिनेश काटे तसेच अभिमान मोरे व मंगेश काटे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. निवेदने, पाठपुरावा व लोकप्रतिनिधींना अवगत करूनही शासन स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पोलीस स्टेशन ही कायदा व सुव्यवस्थेची कणा मानली जाते. अशा महत्त्वाच्या कार्यालयाची अवस्था दयनीय असणे म्हणजे प्रशासनाच्या उदासीनतेचे स्पष्ट उदाहरण आहे. त्यामुळे कोळा गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

सार्वभौमिक मानवाधिकार संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा शासनाकडे ठाम मागणी करण्यात येत आहे की, कोळा पोलीस स्टेशनसाठी तात्काळ नवीन व सुसज्ज इमारत मंजूर करून कामास सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत