Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला विविध गुणदर्शन कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 सांगोला प्रतिनिधी

     न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला. सकाळ सकाळ सत्रात  ज्युनिअर कॉलेजमधील व दुपार सत्रात माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचा "विद्यार्थी -शिक्षक दिन" संपन्न झाला. विज्ञान प्रदर्शनाचे सांगोला आगार चे आगार प्रमुख श्री.विकास पोकळे यांच्या शुभहस्ते  उद्घाटन करण्यात आले. सदर विज्ञान  प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले. दुपार सत्रामध्ये चित्रकला, हस्तकला, विज्ञान व संविधानिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी सौ दिपाली जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद घुगे व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सिकंदर मुलाणी यांच्या शुभहस्ते विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले व विविध गुणदर्शन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी  संस्था सदस्य प्रा.डॉ.अशोकराव शिंदे, प्रा. दीपक खटकाळे, प्रा.जयंत जानकर, प्राचार्य प्रा.केशव माने, उप प्राचार्य प्रा. संतोष जाधव, उपमुख्याध्यापिका सौ वैशाली घोडके मॅडम, पर्यवेक्षक श्री तात्यासो इमडे सर, श्री माणिकराव देशमुख सर, उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सौ.इंदिरा येडगे, माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. स्मिता इंगोले मॅडम, यांच्यासह सर्व कमिटी प्रमुख, सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   प्रा. जयश्री केदार पाटील, प्रा प्रकाश बाबर, प्रा सुवर्णा काशीद, सौ राणी अदलिंगे मॅडम, प्रा. देवेन लवटे तर आभार प्रा दत्तात्रय देशमुख यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत