हातीद येथे माणगंगा परिवाराच्या नूतन दिनदर्शिकेचे वितरण संपन्न..
सांगोला प्रतिनिधी
माणगंगा परिवार अर्बन सोसायटी शाखा हातीद येथे संस्थेच्या नूतन दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे संचालक सचिन इंगोले मालक यांच्या शुभहस्ते व कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे, सरपंच संगीता घाडगे, उपसरपंच संतोष कोळी, उपसरपंच कुलदीप घाडगे, सदस्य सिद्धू होवाळ, ग्राम विकास अधिकारी अविनाश नरळे, यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.
सदर प्रसंगी आरमान भाई तांबोळी, ऑडिटर माणिक भगत, शहाजी घाडगे, शिक्षक दिलीप घाडगे, विजय घाडगे, मेजर वसंत घाडगे, मुकुंद शिंदे, गुलाब ओवाळ, शिवानंद देशमुखे, वजीर शेख, गणेश घाडगे, शिवराज घाडगे, दादासाहेब घाडगे, सुनील घाडगे, शाखा अधिकारी सुनील सावंत, कॅशियर भागवत सावंत, गणेश सुतार इ. उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार कार्यकारी संचालक अक्षय मुडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत