Breaking News

रंगोत्सव आर्ट कॉम्पिटिशन – पायोनियर पब्लिक स्कूलचा अभूतपूर्व यश!


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

रंगोत्सव आर्ट कॉम्पिटिशनमध्ये पायोनियर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला आहे. विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली चमकदार कामगिरी संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

इयत्ता दुसरीतील कुमार अंज्योत अमोल रणदिवे याने रंगभरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाव आणि विशेष पुरस्कारासह स्केटिंग स्कूटर हे बक्षिस मिळविले. तसेच इयत्ता पाचवीतील  कुमार अक्षद दत्तात्रय माळी याला उत्कृष्ट कलाकृतीसाठी फाइव्ह स्टार ब्रिलियंट पुरस्कार मिळाला. तर इयत्ता सहावीतील कुमारी  इश्वरी रविंद्र कंड्रे हिला तिच्या कला प्रदर्शनासाठी आर्ट मेरिट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पूर्व प्राथमिक गटातील छोट्या कलावंतांनीही सुंदर कामगिरी केली. कुमार समर्थ बिरुदेव बंडगर आणि कुमारी सान्वी सागर कोळवले यांना त्यांच्या आकर्षक कलेसाठी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत एकूण २२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, १५ विद्यार्थ्यांना रौप्य पदके, आणि १० विद्यार्थ्यांना कांस्य पदके प्रदान करण्यात आली व शाळेतील ५२ विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल लेवल साठी निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या या मोठ्या यशामुळे शाळेतील संस्कार, सर्जनशीलता आणि कलाशिक्षणाची पातळी अधोरेखित झाली आहे.

या भव्य कामगिरीमुळे पायोनियर पब्लिक स्कूलला बेस्ट स्कूल पुरस्कार मिळाला. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.अनिल येलपले सर यांना त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल विशेष पुरस्कार व सन्मानपत्र देण्यात आले.

शाळेचे प्रिन्सिपल श्री. सतीश देवमारे सर, अकॅडेमीक इनचार्ज मृणाल राऊत, आणि कला शिक्षक सौ. रुपाली गायकवाड यांनाही त्यांच्या समर्पित कार्याबद्दल विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

या भव्य यशामुळे पायोनियर पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शाळेच्या संपूर्ण परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत