Breaking News

देशभक्तीच्या गीताने रसिकांचे वेधले लक्ष..! जि.प. प्रा. शाळा नाझरे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न


 नाझरे प्रतिनिधी 

      शालेय जीवनात अभ्यास करीत असताना इतर क्षेत्रात ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना यश मिळावे हा हेतू ठेवून जि.प. प्रा. शाळा नाझरे ता. सांगोला येथे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. व यामध्ये देशभक्तीच्या गीताने रसिक श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले. 


   सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच विजय सरगर, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख मल्लय्या मठपती, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष ओंकार देशपांडे, उपाध्यक्ष सचिन वाघमारे, रुखया मुलांनी, शाळा समितीचे सर्व सदस्य, शिक्षक नेते अशोक पाटील, अमोघ सिद्ध कोळी, पत्रकार रविराज शेटे, मार्केट कमिटी संचालक बंडू मामा आदाटे, मा. उपसरपंच शशिकांत पाटील, गणीसो काझी, मा. मुख्याध्यापक राजाराम पाटील इ. च्या शुभहस्ते करण्यात आले. सुरुवातीस गणेशाच्या भक्ती गीताने करण्यात आली. तसेच लावणी, गवळण, शेतकरी गीत, देशभक्तीपर गीताने विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापक राजाराम कोळी व सर्व शिक्षक, शिक्षिका, शालेय व्यवस्थापन सदस्य यांनी परिश्रम घेतले.  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत..

        विद्यार्थी शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना त्यांना शाळेची व अभ्यासाची ओढ तर पाहिजेच परंतु याबरोबर विविध गुणदर्शन कार्यक्रमातून देशभक्तीपर गीत गाऊन त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत झाली.

   मल्लय्या मठपती केंद्रप्रमुख 

    नाझरे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत