श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या जन्मोत्सवाने मोराळे नगरी दुमदुमली...! सेवेकरांचा सन्मान करून एक आगळीवेगळी जयंती.. गुरुवर्य भालचंद्र पाटील काका
सांगोला प्रतिनिधी
माझे पुण्य फळा आले आज मी मोराळ्यात दत्तगुरू पाहिले या प्रचितीप्रमाणे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचा जन्मोत्सवाचा सोहळा भजन, नामस्मरण व अनेक क्षेत्रात सेवा केलेल्या सेवेकरांचा सन्मान करून मोराळे पेड ता. तासगाव येथे मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला व एक आगळी वेगळी जयंती साजरी होत असल्याचे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सांगितले. तसेच मोराळे येथे जयंतीचा दिवस फक्त बाह्य उत्सवासाठी नसून शरणागतीसाठी आहे व अहंकार विसरून गुरूच्या चरणी लीन होण्यासाठी आहे.
"मोजता येत नाही मापाने, एवढे वैभव दिले सद्गुरु नाथांने," 'देव हा मोराळचा' मोराळचा शिवदत्त या गुरुआई सौ. प्रियांका ताई संतोष दादा पाटील यांच्या भक्ती गीताने मोराळे येथील सेवेकरी भक्तीरसात नाहून निघाले व याचा अर्थ समजून घ्या तसेच सेवेकरी हे येथील खांब आहेत व त्यावरच मोराळचे श्री दत्तगुरूचे मंदिर उभारणार आहे. व सेवेकराबद्दल किती प्रेम व भक्ती आदर असल्याचे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य संतोष उर्फ बंडू दादा पाटील यांनी दाखवून दिले. यावेळी गुरु आज्ञा चे वाचन करण्यात आले तसेच श्री दत्तगुरु चा पाळणा, पालखी सेवा, महाआरती व सेवेकरांना मान देऊन व सत्कार करून सोहळा करण्यात आला व त्यामुळे सेवेकरांना सात जन्माची पुण्याई लाभल्याचे चित्र चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी भजन, अन्नदान, पार्किंग, लाईट, प्रबोधन हाल, डेकोरेशन, आचारी, पाणी, प्रसिद्धी व इतर क्षेत्रात ही कौतुकास्पद काम केलेला सर्व सेवेकरांचा सन्मान गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य बंडू दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच सेवेकरांच्या वतीने ही दोन्ही गुरुवर्यांचा सन्मान करण्यात आला.श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या आगमन प्रसंगी सर्वांनी स्वागत करून आतिषबाजी करण्यात आली तसेच अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय व शिवदत्त महाराज की जय या जयघोषाने मोराळे नगरी दुमदुमली. तसेच शिवदत्त महाराजांच्या आरतीने ऊर्जा व प्रेरणा मिळाली व जीवनात सुख, शांती व समाधान पाहिजे असेल तर मांसाहार, मद्यपान सोडा व श्री दत्त गुरुचे नामस्मरण करा, भक्ती करा व येथील नियोजित मंदिरास व अन्नदानास मदत करा असे आवाहनही गुरुवर्य संतोष दादा पाटील यांनी यावेळी केले. तसेच खडतर जीवनातून बाहेर पडायचे असेल व स्वतःच्या जीवनाचे कल्याण करण्यासाठी श्री दत्त गुरु भक्ती मनोभावे करा असे आवाहन सेवेकरी सूर्यकांत दादा पाटील यांनी केले. यावेळी श्रीदत्त गुरूच्या फोटो अल्बम चे प्रकाशन करण्यात आले व गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी आम्हा सर्व सेवेकरांचे आयुष्यमान त्यांना लाभो असे सेवेकरी सौ. मासाळ सांगोला यांनी मनोगत सांगितले. सूत्रसंचालन सेवेकरी राहुल शिंदे तर सर्वांचे आभार सूर्यकांत दादा पाटील यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत