चिणके येथील मा. मंडल अधिकारी शिवाजी माने यांचे निधन..
नाझरे प्रतिनिधी
चिणके ता. सांगोला येथील मा. मंडल अधिकारी शिवाजी सदाशिव माने यांचे मंगळवार दि. दोन डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्षे 74 होते.
माने यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, एक भाऊ, सात बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम गुरुवार दि. चार डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता चिणके येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत