Breaking News

मोराळे येथील नरसिंह सरस्वती मंदिरात दत्त जयंतीची जय्यत तयारी..! 4 डिसेंबरला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन..- गुरुवर्य भालचंद्र पाटील काका


 सांगोला प्रतिनिधी 

      आधि गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे मायबाप, नाम घेता हरतील पाप..

     लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव येथे श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असल्याचे गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सांगितले. श्री दत्त जन्मोत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्ताच्या स्वागतासाठी मोराळे नगरी सज्ज झाली असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो श्री दत्त प्रभूंचे भाविक दत्त जयंती साठी मोराळे येथे दरवर्षी येतात. 

   श्री दत्तगुरु चा दुसरा अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव येथे गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी सहा ते नऊ अभिषेक व आरती, सकाळी 9 ते 12 भजन, दुपारी बारा ते साडेबारा नामस्मरण व श्री दत्तप्रभूंची आगमन आणि आरती पाळणा व ग्रंथ वाचन तसेच दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत भक्तांचे मनोगत व दुपारी एक ते दोन गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व संतोष दादा पाटील यांचे प्रबोधन व महाप्रसाद वाटप होणार आहे असे गुरु नरसिंह स्वामीभक्त सूर्यकांत दादा पाटील यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचा स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा व कृतार्थ व्हावे असे आवाहन स्वामीभक्त रवींद्र स्वामी यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत