सिद्धनाथ जन्माष्टमी निमित्त बलवडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन...
नाझरे प्रतिनिधी
बलवडी ता. सांगोला येथील कुलदैवत सिद्धनाथ यांच्या जन्माष्टमीनिमित्त गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर ते गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर अखेर नाथाच्या मंदिरात नवनाथ ग्रंथाचे सामुदायिक वाचन होईल. पारायण मार्गदर्शक हनुमान मंदिर कथाकथन मंडळ व हरिपाठ व किर्तन 7 पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी तासगाव यांची राहील. सप्ताह दररोज रात्री 9 ते 11 हरी किर्तन होईल.
गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी युवा कीर्तनकार सुप्रियाताई बंडगर जवळा यांचे रात्री हरिकीर्तन, शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. हनुमंत महाराज पाटील चिंचणी यांचे हरिकीर्तन, शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. गायनाचार्य कविराज झावरे यांचे हरिकीर्तन, रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी ह भ प शिवचरित्रकार माऊली महाराज बीड यांचे हरिकीर्तन, सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी हभप युवा कीर्तनकार अर्पिता ताई अमराळे रायगड यांचे हरिकीर्तन, मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी ह भ प विनोदाचार्य गणेश डांगे महाराज कडेपूर यांचे हरिकीर्तन, बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी हभप कैलास केंजळे महाराज धर्मपुरी यांचे हरिकीर्तन, गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी हभप समाज प्रबोधनकार आकाश महाराज पाटील संस्थापक अध्यक्ष पांडुरंग शिक्षण संस्था धामणी तासगाव यांचे हरिकीर्तन होईल.
बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाच गजी ढोल, सायंकाळी पाच वाजता पालखीचे सिद्धनाथ मंदिराकडे प्रस्थान, रात्री दहा वाजता ह भ प कैलास महाराज केंजळे यांचे जागर कीर्तन व बारा वाजता फुले टाकणे, पाळणा व पालखी प्रदक्षिणा होईल. तसेच गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता ह भ प आकाश पाटील महाराज यांचे काल्याचे किर्तन व श्रीमती सुधाबाई ढवण यांचा महाप्रसाद वाटप होईल तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धनाथ यात्रा कमिटी व बलवडी ग्रामस्थ यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत