Breaking News

परमेश्वर केंगार अजनाळे पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार


  सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

सांगोला विधानसभा पंचायत समिती अजनाळे गणामधुन अनुसूचित जातीसाठी राखीव आरक्षण पडले आहे त्यासाठी, श्री परमेश्वर विठ्ठल केंगार, रा. यलमर मंगेवाडी, हे पंचायत समितीसाठी जनतेमधून नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

     परमेश्वर केंगार हे या आधी यलमर मंगेवाडी गावचे दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते, व सलग 14 वर्षे यलमर मंगेवाडी गावचे तंटामुक्त उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे त्यावेळी त्यांनी आपला संपूर्ण वेळ गावाच्या विकासासाठी, लोकहितासाठी, लोकांच्या विविध अडिअडचणी सोडवण्यासाठी कारणी लावला होता, त्यानंतरही गावच्या समाजकारणात त्यांचा कायम सक्रिय सहभाग आहे ...

      लोकांच्यामध्ये मिळुन मिसळून राहुन गोरगरीब व वंचीत लोकांसाठी वेळ देणारा लहानात लहान मित्रात मित्र व ज्येष्ठांचा आदर ठेवणारा आपल्यातला आपला माणूस सर्वांना आपला वाटणारा सामान्य कुटुंबातील सामान्य माणूस अशी त्यांची ओळख आहे,             2005 ते 2025 असा वीस वर्षांचा राजकीय व सामाजिक ज्ञानाचा प्रदीर्घ अनुभव व गेल्या पंचवार्षिकचा य. मंगेवाडी गावचा सरपंच पदाचा दावेदार, एकनिष्ठ, संयमी, प्रामाणिक खरं, सत्य व आदराने वागणारा माणुस म्हणून त्यांची जनमानसात प्रतीमा आहे... शेतकऱ्यांविषयी आस्था, तळमळ असणारा, भ्रष्टाचार व लाचलुचतीला विरोध करणारा गरिबीची जाण असणारा सामान्य माणूस म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. 

          सर्वपक्षीय नेत्यांशी व लोकांशी जुळवून घेऊन सर्वांशी आपलेपणा जपल्याने यलमर मंगेवाडी गावातील मोठा मतदार वर्ग आपल्या बाजूने वळवण्यात नक्कीच यशस्वी होतील, तसेच अजनाळे गावातुनं शिक्षण झाल्याने व व्यव्हारीक,  सामाजिक व राजकीय सलोखा असल्यामुळे अजनाळे व लिगाडेवाडी गावचा मोठा मित्र परिवार असल्याने त्याचा मोठा फायदा येत्या निवडणुकीत होईल,

तसेच कमलापुर ही त्यांची सासुरवाडी असल्याने त्यांच्या नातेवाईकांचा मोठा परिवार हुकमी मतदार वर्ग व मित्रवर्ग व्यावसायिक व संबंधित लोकांशी जनसंपर्क याचा चांगला परिणाम मत परिवर्तनात होईल, चिणके व वझरे नातेवाईक व संबंधित लोकांशी संपर्क याचा फायदा होणार आहे...

           येत्या निवडणुकीत छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फूले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श बाळगून शेतकरीबांधव, महिला माता भगिनी, विद्यार्थी, व सामान्य कुटुंबातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुर्ण वेळ देणार असल्याने व स्वतः उच्च शिक्षीत (पोस्ट ग्रॅज्युएट, एम. ए.) असल्याने लोकांच्या समस्या मांडण्यात व सोडवण्यात सक्षम नेतृत्व असल्याचे व एकंदरीत पाहता ही उमेदवारी विरोधकांना घाम फोडणारी व जड जाणारं असल्याचे जनमाणसातुन बोलले जाते आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत