धर्माचे आचरण करा, स्वधर्माने वागा व अभिमानाने जगा.. - श्री गुरु मनीकंठ महास्वामीजी
नाझरे प्रतिनिधी
श्री गुरुने दिलेले लिंग रक्षण करते व सर्व देवी देवतांनी लिंग धारण केल्याने पावन झाले व ईस्ट लिंग धारण केल्याने देवच तुमच्याजवळ आहे व वीरशैवात देहच देव आहे, देहालय म्हणजे शिवालय होय व अक्कम महादेवी व हेम रेड्डी मल्लम्मा या शिवभक्ती करून श्रेष्ठ झाल्या त्याप्रमाणे वीरशैव समाजातील सर्वांनी लिंग धारण करून धर्माचे आचरण करून, स्वधर्माने वागून अभिमानाने जगणे गरजेचे आहे असे श्री गुरु मनीकंठ महास्वामीजी यांनी वीरभद्र मंदिर नाझरे ता. सांगोला येथे आशीर्वाचनात सांगितले.
श्री हनुमंताला दीक्षा देणारे वीरभद्र होय व शिवा साठी त्या करणारा शिवभक्त दक्ष प्रजापती दरबारात शिवाला निमंत्रण नव्हते याचा राग सर्व शिवभक्तांना व पार्वतींना आला तरीही पार्वती शंकराला म्हणाली आपण जाऊच व हट्ट धरल्याने महादेव गेले व तेथे कोणीच विचारेना, त्यामुळे पार्वतीला वाईट वाटले व पती निंदा सहन झाली नाही, सतीने प्राण त्याग केला व भगवान शंकर क्रोधीत झाले व तांडव करून जटा दगडावर आपटल्याने विरभद्र महाराज उत्पन्न झाले व वीरभद्राचा इतिहास फार मोठा आहे, हजारो सूर्य, प्रकाश याची ताकद देवात होती व वीरभद्राला शांत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले परंतु देवाने सर्वांना मारले व दक्षाचा शिरच्छेद केला व शिवनेंदेचे पाप म्हणून शिक्षा केली व बकऱ्याचे शिर दक्षाला देऊन नंतर पुनर्जीवन दिले असा हा वीरभद्राचा प्रताप आहे व त्यामुळे तुम्ही शूर वीरा सारखे रहा व वीरभद्राचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळो व यासाठी लिंग पूजा करून वीरभद्राचे नामस्मरण करा जीवनात काही कमी पडणार नाही असेही गुरु सिद्ध मनीकंठ शिवाचार्य महास्वामींनी आशीर्वाचनात सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत