Breaking News

थंडीत शरीराची काळजी घ्या..-डॉ. शिवाजीराव ढोबळे


नाझरे प्रतिनिधी 

        थंडीच्या लाटेमुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होतात, सध्या परतीचा पाऊस थांबल्यापासून वातावरणात गारवा जाणवू लागला आहे व गेली आठ ते दहा दिवस झाले तापमानात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे व यामुळे वयोवृद्ध नागरिक, गरोदर माता, महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थी यांनी शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे असे डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी सांगितले. 

   नागरिकांनी थंडीची लाट असेपर्यंत स्वेटर, मफलर, कान टोपी, हात मोजे, पाय मोजे इत्यादी उबदार कपडे वापरावेत व थंडीला पूरक असा आहार घ्यावा, मद्यपान करू नये व थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी आजारात वाढ होत आहे व अचानक येत असलेल्या थंडीच्या लाटेमुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होतात तरी नागरिक, महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थी यांनी थंडीपासून बचाव करण्याची खबरदारी घ्यावी व पिण्यासाठी कोमट पाण्याचा व शेकोटीचा वापर करावा असे आवाहनही डॉक्टर ढोबळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत