लवंगी येथे ऊस वाहतुकीसाठी रिफ्लेक्टर बसविणे व चालक मार्गदर्शन उपक्रम..! अपघातमुक्त ऊस गळीत हंगामासाठी मंगळवेढा पोलिसांचा पुढाकार..!!
विशेष प्रतिनिधी: येताळा खरबडे
या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक मंडळ, कारखाना प्रशासनाचे पदाधिकारी, ऊस वाहतूक करणारे वाहनचालक व मालक, संबंधित गावचे पोलीस पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ऊस वाहतुकीत सुरक्षितता वाढविण्यास मदत होणार असून, वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक पिसे, वाहतूक विभागातील पोहेकॉ १४२१ यादव, पोकॉ १०६८ साळुंखे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. त्यांनी उपस्थित वाहनचालकांना अपघात प्रतिबंधक उपाय, रस्त्यावरील शिस्त, आणि वाहनांच्या देखभालीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करताना रिफ्लेक्टर असलेल्या वाहनांचा वापर, रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशयंत्रणा आणि हेल्मेट/सीटबेल्ट वापरण्याचे आवाहन केले. सुरक्षित वाहतूक व जबाबदार वाहनचालना यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाचे कारखान्याच्या प्रशासनासह स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत