अजित पवार यांनी राजीनामा द्यावा व पार्थ पवार यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करावा – बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विशेष प्रतिनिधी: येताळा खरबडे
सोलापूर (प्रतिनिधी) – बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्हा तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा तसेच पार्थ पवार यांनी महार वतन जमीन घोटाळा केल्याच्या प्रकरणी शासनाने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदन प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे, जिल्हा अध्यक्ष बबलू गायकवाड, शहर अध्यक्ष देवा उघडे, जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत काळे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, शहर प्रभारी सुहास सुरवसे, शहर उत्तर महासचिव जालिंदर मसलखांब, तसेच महेंद्र कांबळे, नितीन क्षीरसागर, सौरव लोंढे, रोहन बनसोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सामान्य जनतेच्या मालकीची महार वतन जमीन बेकायदेशीररीत्या हस्तगत केली जात असून त्यावर शासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती नोंद घेऊन शासनाकडे अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत