Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या पुणे विभाग शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी एस.के.चव्हाण यांची नियुक्ती..! सेवा, संस्कार आणि संघर्षाची भेट चव्हाण यांच्याकडे शिक्षक आघाडीची जबाबदारी


 सोलापूर प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक, सामाजिक आणि राजकीय चळवळीत सातत्याने योगदान देणारे मा.शिवश्री श्रीकांत शकुंतला कालिदास चव्हाण (एस.के.चव्हाण) यांची संभाजी ब्रिगेड पार्टी शिक्षक आघाडी पुणे विभाग प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेच्या कामात श्रम, वेळ, बुद्धी, कौशल्य आणि आर्थिक योगदान देऊन सातत्याने कार्यरत असलेल्या चव्हाण यांच्या कार्याची गंभीर दखल घेत केंद्रीय कार्यकारिणीने त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे. समाज संघटन आणि पक्ष संघटन बळकट करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.

एस.के.चव्हाण यांची सेवा आणि सामाजिक बांधिलकी विशेष उल्लेखनीय एस.के.चव्हाण यांनी आजवर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमात मोलाची कामगिरी बजावली आहे. गोरगरीब जनतेसाठी त्यांनी अनेकदा स्वखर्चाने मदतीचा हात पुढे केला आहे. शिक्षक या पवित्र व्यवसायातून अनेक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, पुस्तके साहित्य मिळवण्यासाठी तसेच शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी त्यांनी मोठी मदत केली आहे.

स्वतःच्या वाढदिवशी सामाजिक उपक्रम राबवण्याची त्यांची प्रेरणादायी परंपरा असून, वृक्षलागवड, रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य वितरण अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी समाजाशी नाळ जपली आहे.कोरोना महामारीच्या काळातही चव्हाण यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गोरगरिबांच्या घरी स्वखर्चाने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व संसारोपयोगी साहित्य पोहोचवले. संकटाच्या काळात दिलेली ही मदत जनतेच्या मनात आजही स्मरणात आहे.त्यामुळे त्यांची नियुक्ती शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी केली आहे.

यावेळी महासचिव सौरभ खेडेकर,अध्यक्ष मनोज आखरे व पदविधारचे समन्वयक मनोज गायकवाड,कार्यकारिणी सदस्य किरणराज घाडगे,संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप यांनी चव्हाण यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करत,त्यांच्या नेतृत्वामुळे पुणे विभागात शिक्षक आघाडीचे कार्य अधिक वेगाने व प्रभावीपणे वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे.एस.के.चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे संघटनाला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत