Breaking News

बलवडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड


 नाझरे प्रतिनिधी 

        बलवडी ता. सांगोला ग्रामपंचायत उपसरपंच पदी बापू, आबा गटाचे शिवाजी नानासो शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या अगोदरचे उपसरपंच रविराज शिंदे यांनी राजीनामा दिल्याने त्यांची निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक राजकुमार ताटे यांनी काम पाहिले, तर अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली राऊत हे होते.  

    सदर निवडीनंतर नूतन उपसरपंच शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच रविराज शिंदे व सरपंच माऊली राऊत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तसेच ग्राम सदस्य कृष्णदेव कारंडे, बाबासो पालसांडे, सौ. शारदा धायगुडे, सौ. सुनिता तोरणे, सौ, सुरेखा पवार, सौ. राधाबाई राऊत, सौ. नंदा करडे, सौ. मनीषा गुरव, सौ शशिकला शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. निवडीनंतर मा. सरपंच बाळासो शिंदे, विजय दादा शिंदे, सरपंच माऊली राऊत, मा. उपसरपंच रविराज शिंदे, नूतन उपसरपंच शिवाजी शिंदे, महादेव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. 

 सदर प्रसंगी डॉ. शिवाजीराव ढोबळे, युवा नेते सत्यजित लिगाडे, सोसा. चेअरमन शिवाजी शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे, उपाध्यक्ष बाळासो कारंडे, शा. समिती अध्यक्ष बाळासो खुळपे, मा. सरपंच प्रसाद शिंदे, गणेश कमले, विकास मोहिते, प्रा. राजू तोरणे, मुख्याध्यापक संभाजी शिंदे, मनोहर पवार, एस.वी. शिंदे, नेताजी शिंदे, नानासाहेब शिंदे, धनाजी शिंदे, विजय गुरव, विकास पवार, दत्ता निंबाळकर, विलास बापू शिंदे, रविराज लिगाडे, विजयकुमार नानासो शिंदे, सर्जेराव शिंदे, सचिन गायकवाड, सुरेश गुरव, डॉ. अमर धायगुडे, डॉ. गणेश निंबाळकर, पो. पाटील श्रीकांत तोरणे, सोमनाथ पंडित, मोहन शिंदे, संतोष खुळपे, बबलू हांडे, बंडू शिंदे, सचिन चव्हाण, समाधान शिंदे, सदाशिव गायकवाड, सुरज तोरणे, चंद्रकांत मोहिते, ग्रामस्थ, महिला, युवक, ग्रामपंचायत 

 कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व सर्वांचे आभार मा. उपसरपंच समाधान शिंदे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत