अजनाळे येथील युवा उद्योजक, प्रगतशील बागायतदार आणि जेके इंटरप्राईजेस चे मालक मा. जयराम करमुडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
अजनाळे (प्रतिनिधी):
अजनाळे येथील युवा उद्योजक, प्रगतशील बागायतदार आणि जेके इंटरप्राईजेस चे मालक मा जयराम करमुडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जयराम करमुडे हे गेल्या काही वर्षांपासून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणारी अवजारे आणि साधने तयार करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे जेके इंटरप्राईजेस या उद्योगसंस्थेने सांगोला तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने मोठ्या आनंदात कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी प्रवीण येलपले, किरण येलपले, शामराव पुजारी, अनिल लाडे, शाहरुख शेख, संजय येलपले, समाधान धांडोरे, ज्ञानेश्वर भंडगे, सागर चव्हाण, राकेश बनसोडे, रमेश येलपले, विशाल येलपले, कुलदीप कोळवले, रोहित चव्हाण, वेदांत येलपले, बाळासाहेब चौगुले,
अनिल नंदीवाले, नागेश बनसोडे, आदी मित्रमंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमात जयराम करमुडे यांनी केक कापून सर्वांसह वाढदिवस साजरा केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत उत्सवमय वातावरणात वाढदिवस साजरा केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत