पर्यावरण दिनानिमित्त पायोनियर पब्लिक स्कूल य.मंगेवाडी मध्ये वृक्षारोपण
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिन पायोनिअर पब्लिक स्कूल (CBSE) मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेच्या परिसरात ५१ झाडांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर यांच्या हस्ते झाला. प्रिन्सिपल श्री सतीश देवमारे सरांनीही वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेच्या कर्मचारी वर्गाने खड्डे खोदणे, झाडांना पाणी देणे आणि व्यवस्था सांभाळण्यात मोलाचे सहकार्य केले.
वृक्षारोपणासोबत झाडांची निगा तितकीच महत्त्वाची आहे. फक्त झाडे लावून पर्यावरण दिन साजरा होत नाही, तर त्या झाडांची नियमित देखभाल करून ती वाढवणे हेच खरे पर्यावरण रक्षण आहे. याच उद्देशाने शाळेने झाडांच्या संरक्षणाची जबाबदारीही विद्यार्थ्यांना दिली आहे.
“झाडे लावा – जीवन वाचवा” या घोषवाक्याला कृतीची जोड देत शाळेने पर्यावरणपूरक उपक्रमांची सुंदर सुरुवात केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत