Breaking News

नाझरे येथे हेम रेड्डी मल्लमा जयंती उत्साहात साजरी


 नाझरे प्रतिनिधी 

       वीरभद्र मंदिर नाझरे ता . सांगोला येथे  हेम रेड्डी मल्लमा जयंतीनिमित्त वीरशैव महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी प्रतिमेचे पूजन सौ व श्री राजाराम खोकले, सौ व श्री प्रवीण पाटील, सौ . व श्री अशोक पाटील, सौ व श्री संजय पाटील, सौ व श्री विशाल चौगुले , सौ व श्री आकाश चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.   

तसेच नयन लिंगाप्पा पाटील व मंगल वसंत चौगुले यांच्या शुभहस्ते हेम रेड्डी मल्लम्मा यांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले. महात्मा बसवेश्वरांच्या विचारधाराने प्रेरित झालेल्या मल्लमा नी शिवभक्ती मनापासून केली व त्या संत होत्या तसेच त्यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही व सर्व रेड्डी समाज सुखी करण्यासाठी त्यांचा अवतार होता तरी सर्वांनी प्रपंच व परमार्थाची सांगड घालून भक्ती करा व प्रत्येकाने गुरु करा व ओम नमः शिवाय नामस्मरण करा असे मा. केंद्रप्रमुख मोहन जोंधळे यांनी यावेळी सांगितले. तर देवळात न जाता भक्ती करणाऱ्या मल्लमा होत्या व नाझरे येथे त्यांची जयंती प्रथम साजरी करण्यासाठी कोळीगिरीकर महाराज यांनी प्रयत्न केले. तसेच भक्ती महान होती. यापुढे दरवर्षी 10 मेला जयंती साजरी होणार असल्याचे नयन लिंगाप्पा पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच नाझरे, वझरे, कारंडेवाडी येथील रेड्डी समाज व इतर समाज बांधव, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत