Breaking News

२७ मे २०२५

महावितरण मधील अशोक आलदर यांचा राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मान


सांगोला (प्रतिनिधी)-

समाजसेवेचे व्रत हाती घेऊन विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून काम करनारे व  महावितरण उपविभाग हातीद मधील उपकेंद्र अकोला येथे कार्यरत असलेले अशोक सुऱ्याबा आलदर रा उदनवाडी ( झापाची वाडी ) यांना मुरुम ता. उमरगा येथे रविवारी सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

       मुरूम येथे बसवप्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय बसव रत्न पुरस्कार देऊन 27 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यात सांगोला येथील अशोक सुऱ्याबा आलदर यांचा समावेश होताका 

र्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. सह संचालक साखर आयुक्तालय पुणे डी. आय. गायकवाड, विठ्ठलसाई  कारखाना संचालक  विठ्ठलराव बदोले, उद्योजक बालाजी सुरवसे, मुख्याधिकारी  सचिन भुजबळ, माजी  नगराध्यक्ष रशीद शेख,  शाहीर रमेश खाडे, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदीसह आलदर कुटुंबीय उपस्थित होते.  अगोदरही अशोक आलदर यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेतया 

वेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थांना प्राथमिक स्वरुपात शालेय साहित्याचा वाटप केले. अशोक आलदर यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल  समाजातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या  आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा