Breaking News

नऊदारे येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


 

विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर :-  धम्मगुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार व्यवस्थापन समिती व राहुल तरुण मित्र मंडळ नऊदारे यांच्या संयुक्त विद्यमाने

धम्मगुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार नऊदारे येथे

तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती  विविध कार्यक्रमाने भव्यदिव्य साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान वालचंदनगर येथून धम्मज्योत प्रज्वलन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

यावेळी धम्म ज्योत नऊदारे येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर विहारांसमोरील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

 विहारांमध्ये बुद्ध पूजा बुद्ध वंदना घेण्यात आले व नंतर धम्म ज्योती साठी आलेल्या कार्यकर्त्यांना अल्पोपहार देण्यात आला. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वालचंदनगर पंचक्रोशीतील रत्नपुरी,  कौलारू कॉलनी,  घोडके वस्ती, उखळमाळ आठदारे, आंबेडकर कॉलनी,  व वालचंद नगर येथील मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

सायंकाळी बुद्ध विहार परिसरात जिव्हाळा लेझीम संघ शिरभावी सांगोला यांचा बुद्ध भीम गीतांवरती लेझीम नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

बुद्ध विहारात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी माननीय अतुल सावंत (सरपंच) यांच्या परिवाराकडून संगणकाचा संच भेट देण्यात आला तसेच 

 मार्गदर्शक मा. सचिन बनसोडे साहेब यांच्या कडून अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षांचा पुस्तकांचा संच देण्यात आला  .

उपासक आणि उपासिका यांचा समवेत सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले 

आणि त्या नंतर अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपासिका आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय शांत संयमी 

हर्षउल्लासाच्या वातावरणामध्ये शांततेत बुद्ध जयंतीचा हा कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत