Breaking News

चिणके येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जल्लोषी मिरवणूक.. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली - देखाव्याने लक्ष वेधले.


 

नाझरे प्रतिनिधी  

           छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त चिनके ता. सांगोला येथे मंडळाच्या वतीने लक्षवेधी मिरवणूक, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, डीजेचा दणदणाट व संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगून हिंदवी स्वराज्याचे रक्षक धर्मवीर संभाजीराजे यांना सर्वपक्षीय अभिवादन करून, इयत्ता दहावी व इयत्ता बारावी तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून एक आगळीवेगळी जयंती साजरी करून पैलवान संतोष मिसाळ, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी सुरेख नियोजन केले होते. 


पैलवान संतोष मिसाळ जयंती साठी खास दुबईहून आले असे सरपंच विनायक मिसाळ यांनी सांगितले व त्यामुळे त्यांचे योगदान मोठे आहे असे मा. सभापती बाळासो काटकर यांनी सांगितले. तर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अरविंद केदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे या मातीवर उपकार आहेत व बापूसो ठोकळे व किशोर बनसोडे तसेच इतर सर्व जातीतील व ग्रामस्थांचे गावात सलोका राखण्यासाठी योगदान फार मोठे आहे असे सांगितले. तर गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना रुपये पाच हजार मदत मी जाहीर करीत आहे असे डॉक्टर राज मिसाळ यांनी यावेळी सांगितले. तर शिवसेना नेते सागर दादा पाटील व युवा नेते यश राजे साळुंखे पाटील यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 

   


  
सदर प्रसंगी सर्वपक्षीय नेतेमंडळीत गुंडा दादा खटकाळे, प्रा. हनुमंत कोळवले, अमोल खरात, बाळासो शिंदे, पोपट शेठ यादव, बापूसो ठोकळे, किशोर बनसोडे, पप्पू आईवळे, बापू भाकरे, बंडू मेखले, महादेव पवार, इंजिनीयर महादेव माने, विवेक कोळसे पाटील, विजय इंगोले, स्वप्निल बाबर, अजय सुरवसे, पत्रकार रविराज शेटे, सरपंच नाथा खंडागळे, उपसरपंच मोहन मिसाळ, मा सरपंच विनायक दादा मिसाळ, अशोकराव शितोळे, नारायण मिसाळ, डॉक्टर मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मिसाळ, बाळासो मिसाळ, प्रकाश मिसाळ, भीमराव मिसाळ, मा. सरपंच विलास मिसाळ, प्रा. जालिंदर मिसाळ, प्रा. विनायक पाटील, बाळासो शिंदे, भागत राव दादा मिसाळ, योगेश दादा खटकाळे, वैभव दादा केदार, तानाजी कवठेकर, मंडळाचे सर्व प्रतिनिधी, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन जगताप, स्नेहल चव्हाण, भानवसे, जाधव, वंजाळे, क्षीरसागर यांनी चोख बंदोबस्त ठेवला सूत्रसंचालन अशोक शितोळे व मोहन मिसाळ तर आभार मा. सरपंच विनायक मिसाळ यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत