संतभूमीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करुया - मेहता
सांगोला प्रतिनिधी
गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची हा अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नूतन गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी दिली.
मंगळवेढा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी श्री. दर्शन मेहता यांची नुकतीच नव्याने नियुक्ती झाली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यानिमित्ताने त्यांचा स्वागतपर सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मंगळवेढा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना मेहता यांनी मंगळवेढा या संतभूमीमध्ये शैक्षणिक कार्य करण्याची संधी मिळाली आहे. प्रशासन अधिक गतिमान करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना निकोप वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी अग्रक्रम राहील असा निर्वाळा दिला. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या हस्ते मानाचा फेटा, शाल, पुष्पहार व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. तर मंगळवेढा बीटच्या शिक्षण विस्ताराधिकारी पदी पदोन्नती मिळालेबद्दल बाळासाहेब आवताडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार , पी.जी.राठोड , पंडित कोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकांतून तालुकाध्यक्ष विठ्ठलराव ताटे यांनी शिक्षक समितीच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य व उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी शिक्षक नेते लक्ष्मण घुले, संभाजी सुळकुंडे , राजेंद्र कांबळे, धनंजय लेंडवे यांनी आपल्या मनोगतातून मंगळवेढा तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून हाती घेण्यात येणार्या सर्व उपक्रमांना आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी शिक्षक समितीचा इतिहास, राज्य व जिल्हा स्तरावर पाठपुरावा सुरु असलेल्या प्रश्नांची माहिती दिली तसेच शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुका शाखेला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सूत्रसंचालन दिगंबर कुचेकर यांनी केले तर आभार गजानन लिगाडे यांनी मानले. यावेळी रावसाहेब सुर्यवंशी, अनिल दत्तू, शिवाजी शिलेदार, पांडुरंग शिंदे, सुर्यकांत जाधव, संतराम लाड , दत्तात्रय गवळी, हरीराम काळुंगे, दत्तात्रय सुरवसे, श्रीरंग आवळेकर, विश्वासराव आवताडे, घनश्याम शिंदे, नाथाजी कांबळे, अशोक इंगळे, किसन काळुंगे, महादेव माने , पांडुरंग कुलकर्णी, सिद्राम सावळे इत्यादी शिक्षक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गट साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत