एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने कोल्हापूर येथे 31 मे रोजी राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार व मेळावा
कोल्हापूर (प्रतिनिधी)
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवार दिनांक 31.05.2025 रोजी सकाळी दहा वाजता लोटस हॉल छत्रपती शाहू मार्केट यार्ड रेल्वे गुडस शेजारी कोल्हापूर येथे राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री प्रकाशजी आबिटकर यांचे शुभहस्ते आणि खासदार धैर्यशील माने ,आमदार राजेश क्षीरसागर,आमदार चंद्रदीप नरखे,प्रशांत साळुंखे शिवसेना वैद्यकीय कक्षा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख,शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख आरोग्यदूत भावी शिक्षक आमदार मंगेश चिवटे,शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर मनीष काळजे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार व संस्थाचालक मेळावा घेण्यात येणार असल्याचे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष, पुणे बोर्ड सदस्य,संस्थापक श्री तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था सोलापूर आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा डॉ बापुसाहेब आडसुळ यांनी सांगितले आहे सदर कार्यक्रम प्रसंगी राज्यातील 50 आदर्श संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित येणार आहे यावेळी राज्यभरातून 2000 संस्थाचालक,मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित राहणार आहेत पुरस्कारासाठी ज्या इच्छुक संस्था असतील त्यांनी आपले प्रस्ताव रविवार 25.05.2025 पर्यंत प्रा डॉ बापुसाहेब आडसुळ (8530192877) या नंबर वरती व्हाट्सअप करावेत असे आव्हान पुरस्कार समितीच्या वतीने संयोजक प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ यांच्या वतीने करण्यात येत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत