लिंगैक्य कोळेकर महास्वामीजी (30 वे पिठाधिपती) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कोळे मठात विविध कार्यक्रमाचे आयोजन
नाझरे प्रतिनिधी :
गुरु एक तूची माझा
विधाता आचल...
गुरु विना सुने सारे
विश्व हे सकल...
श्री गुरु मूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या आशीर्वादाने व श्री श्री श्री 108 रुद्र पशुपती कोळेकर महाराज 31 वे पिठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगैक्य गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गुरुवादी मठ कोळे ता. सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे वीरशैव लिंगायत समाज व समस्त ग्रामस्थ कोळे यांनी सांगितले.
शनिवार दिनांक 31 मे रोजी पंचाचार्य पूजन, पार्वती परमेश्वर पूजन, नवग्रह पूजा, नांदी पूजा, चतुर्थी पूजा, स्वस्ती पुण्य वाचन पूजा, रुद्र पूजा, गणेश याग, परमरस्य ग्रंथाचे वाचन व सायंकाळी महिला भजनी मंडळ कोळे व वीरशैव भजनी मंडळ नाझरे यांचे भजन तसेच शिवभक्त हनुमंत कोरे महाराज यांचे कीर्तन होईल. रविवार एक जून रोजी रुद्रयाग, होम हवन, परम रहस्य ग्रंथ वाचन समाप्ती व सायंकाळी सात वाजता मस्तान भजनी मंडळ मंगळवेढा, वीरशैव भजनी मंडळ नाझरे यांचे भजन तर शिवभक्त राजेश्वर स्वामी लाळेकर यांचे कीर्तन होईल.
सोमवार दिनांक 2 जून रोजी ब्रह्म मुहूर्तावर श्रीच्या समाधीस रुद्राभिषेक, सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठा, मंगल आरती, तसेच श्री श्री श्री 108 गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी चिटगुपा यांच्या आशीर्वाचन, महाप्रसाद व आग्नेय स्वामी, पुराणिक व सहकारी उपस्थित राहतील तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरु गादी मठ कोळे तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत